BJP MLA । नांदेड : भाजप (BJP) आमदाराने नरसी नामदेव येथील संस्थांचे (Narsi Namdev Trust) विश्वस्त अंबादास गाडे यांना खुर्च्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिशोब विचारल्यानंतर राग अनावर झाल्याने आमदाराने हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापू शकते. (BJP MLA Tanaji Mutkule)
Salman Khan । सलमानशी पंगा नको रे बाबा! ‘या’ लोकप्रिय क्रिकेटरच्या मेहुण्याच झालं मोठं नुकसान
नरसी नामदेव या ठिकाणी नामदेव महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम सुरू असून याबाबत हिशोब मागण्यासाठी विश्वस्त मंडळीच्या वतीने 18 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित केली होती. भाजप आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांनी त्यांच्या समर्थकांसह बैठकीला हजेरी लावली होती. त्यावेळी विश्वस्ताने कामाचा हिशोब मागितल्याने मुटकुळे यांना प्रचंड राग आला.
Pune Crime । संतापजनक! घरच्यांनीच महिलेची साडी चोरून केला जादूटोणा
राग अनावर झाल्याने मुटकुळे यांनी त्यांच्या समर्थकांसह विश्वस्ताला पाठीमध्ये खुर्च्यांनी बेदम मारहाण केली. अंबादास गाडे असं मारहाण झालेल्या विश्वस्ताचे नाव त्यांच्यावर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. परंतु या प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.
Govinda । गोविंदानं सांगितलं चित्रपटांमध्ये काम न करण्यामागच कारण, म्हणाला; “स्वत:लाच कानाखाली..”