Govinda । गोविंदानं सांगितलं चित्रपटांमध्ये काम न करण्यामागच कारण, म्हणाला; “स्वत:लाच कानाखाली..”

Govinda said the reason behind not working in films, said; "Himself under the ear.."

Govinda । बॉलिवूडचा स्टार अभिनेता (Bollywood actor) गोविंदाने नव्वदचा दशक चांगलाच गाजवला होता. त्याकाळी त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला यायचे. त्याला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळायचा. अनेक अभिनेत्री, दिग्ग्ज अभिनेत्यांसोबत त्याने काम केले आहे. परंतु मागील काही काळापासून तो बॉलिवूडपासून (Bollywood Industry) लांब आहे. यामागचं आता त्यानेच कारण सांगितलं आहे त्यावरून चर्चाना उधाण आले आहे. (Latest Entertainment News)

Crime News । भयानक! असं काय घडलं की पोलिसानं स्वतःच्याच चार महिन्याच्या चिमुरड्याला आपटलं रस्त्यावर

“कोणतेही काम मी लवकर स्वीकारत नाही. परंतु अनेकांना असं वाटतं की मला कोणतेच काम मिळत नाही. मला त्यांना हे सांगायला आवडेल की मागील वर्षी मी एकूण 100 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट सोडला आहे. त्यावेळी मी आरशासमोर उभा राहून स्वत:ला कानाखाली मारून घेत होतो, कारण मी एकही प्रोजेक्ट साइन करत नव्हतो. मला खूप पैसे मिळत होते परंतु मला चांगली भूमिका मिळत नव्हती,” असं गोविंदाने स्पष्ट केले. (Govinda News)

Women Reservation Bill 2023 । मोठी बातमी! आज होणार महिला आरक्षण विधेयकावर तब्बल 7 तास चर्चा

दरम्यान, आता पाँझी घोटाळ्यात (Ponzi scams) गोविंदाचे नाव समोर आले असून आर्थिक गुन्हे शाखेकडून पाँझी घोटाळ्यातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. या घोटाळ्यात एकूण 2 लाखांपेक्षा जास्त लोकांची तब्बल 1000 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत सोलर टेक्नो अलायन्स अनेक देशांत क्रिप्टो गुंतवणुकीच्या बहाण्याने ऑनलाइन पाँझी ही योजना चालवली होती. हा घोटाळा उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Social Media । काय सांगता? सोशल मीडिया वापरासाठी आता वयाची अट? हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Spread the love