Ajit Pawar । सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी, व्हिडिओ पाहून काय म्हणाले अजितदादा?

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. त्यापूर्वी अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत. निवडणूक आयोग आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकते. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) केलेल्या बंडामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची होऊ शकते. (Latest marathi news)

Cylinder Blast । क्षणांत उध्वस्त झाला संसार! लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती-पत्नीसह ५ जणांचा होरपळून मृत्यू

अशातच गायक अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) यांनी अजित पवार यांची एक मुलाखत घेतली. यावेळी अजित पवारांना गुप्ते यांनी सुप्रिया सुळेंबाबत (Supriya Sule) एक प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना अजित पवार म्हणाले की, ” आज माझी राजकीय भूमिका वेगळी आहे. घरगुती नातेसंबंध वेगळे आहेत. आमच्या घरात वसंतदादा पवार हे शेकापचे नेते होते. तर एक व्यक्ती काँग्रेसचं काम करत होती. कारण त्यांना यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसची विचारधारा पटलेली होती,” असं अजित पवार म्हणाले.

CNG Price । दिलासादायक! सीएनजी गॅसच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर

“मी वडिलधाऱ्यांचा आदर करत आलो असून यापुढेही करत राहील. जुन्या आठवणी काढल्या तर त्या त्या काळातील आहे. आताचा काळ पूर्णपणे बदललेला आहे. आम्ही वेगळे काही केले असा काही भाग नाही. आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेऊन आम्ही भाजपासोबत जाऊ शकतो. आम्ही जर शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर शिवसेना-भाजपा यांच्यात काय फरक आहे?” असा सवालही अजित पवारांनी विचारला.

Justice Abhijeet Gagopadhyay । सकाळी दिला हायकोर्टाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा तर दुपारी केली भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा

Spread the love