Maharashtra Politics । …तर बारामतीतून सुनेत्रा पवार आमच्या उमेदवार, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचे मोठं वक्तव्य

Maharashtra Politics

Maharashtra Politics । निवडणूक आयोग आता कधीही लोकसभा निवडणूक (Loksabha election) जाहीर करू शकते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. बारामतीत यंदाची निवडणूक अटीतटीची असू शकते. बारामतीत यंदा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे (Sunetra Pawar Vs Supriya Sule) असा सामना होऊ शकतो. यावर आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Ajit Pawar । सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी, व्हिडिओ पाहून काय म्हणाले अजितदादा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की, “बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) याच निवडणूक लढवणार. राष्ट्रवादीच्या पहिल्या टप्प्याच्या आढावा बैठकीनंतर सुनील तटकरेंनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता बारामतीतून सुनेत्रा पवार जागा निवडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

Cylinder Blast । क्षणांत उध्वस्त झाला संसार! लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती-पत्नीसह ५ जणांचा होरपळून मृत्यू

“मागील 40 वर्षात अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी योगदान दिले असून आगामी निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात त्याचे परिणाम दिसून येतील”, असेही सुनील तटकरे म्हणाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आढावा बैठक घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या जागेच्या संदर्भात त्या-त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी सुनील तटकरे बोलत होते.

CNG Price । दिलासादायक! सीएनजी गॅसच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर

Spread the love