Cylinder Blast । क्षणांत उध्वस्त झाला संसार! लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पती-पत्नीसह ५ जणांचा होरपळून मृत्यू

Cylinder Blast

Cylinder Blast । अनेकदा काही क्षणांतच संसार उध्वस्त होतात. अशीच एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) झाला. यामध्ये पती-पत्नीसह ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे छत आणि भिंती कोसळल्या आहेत. (Latest marathi news)

CNG Price । दिलासादायक! सीएनजी गॅसच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर

ही घटना लखनऊमधील काकोरी शहरात घडली आहे. काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जरदोजी कारागिराच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या दोन सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की, स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे घराचे छत आणि भिंती कोसळल्या. या दुर्घटनेत पती-पत्नीसह ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.

Justice Abhijeet Gagopadhyay । सकाळी दिला हायकोर्टाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा तर दुपारी केली भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा

काल मृत पती-पत्नीच्या लग्नाचा वाढदिवस होता. घरातील इतर सदस्यांच्या मतानुसार खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला. अपघाताची माहिती मिळताच तातडीने एसीपी, सीएफओ आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वीज विभागाला माहिती देऊन तातडीने वीज बंद केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.

Supriya Sule । राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फूट नाहीच’, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं खळबळ

Spread the love