Justice Abhijeet Gagopadhyay । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. त्यापूर्वी अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकते. अशातच आता एक अजबच पक्ष प्रवेश घडून येण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा देत न्यायमूर्ती भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. (Latest marathi news)
कलकत्ता हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आज सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि दुपारी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत असं जाहीर केलं. त्यांनी पक्ष प्रवेशाची तारीखही जाहीर केली आहे. अभिजीत गंगोपाध्याय (Abhijeet Gagopadhyay) असं या न्यायमूर्तींचं नाव आहे. गंगोपाध्याय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याकडं राजीनामा दिला आहे.
Manoj Jarange Patil । …तर जेलमध्येही मोर्चा काढणार, जरांगे पाटलांनी सरकारला दिलं खुलं आव्हान
तसेच त्याची कॉपी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश टीएस शिवज्ञानम यांना पाठवली आहे. दरम्यान, कालच त्यांनी असं म्हटलं होतं की, आपण न्यायमूर्ती म्हणून आपलं काम पूर्ण केलं आहे. काही वकिलांनी त्यांना न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरला होता.