Supriya Sule । राजकीय वर्तुळात खळबळ! सुप्रिया सुळेंबाबत धक्कादायक बातमी समोर

Supriya Sule

Supriya Sule । महाराष्ट्रात बारामतीच्या जागेवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातच लढत आहे, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सुनेत्रा पवार यांचे ३५ लाख रुपये थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का, बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; फडणवीसांची घेतली भेट

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, सुप्रिया सुळे यांच्याकडे पार्थ पवार यांचेही 20 लाख रुपये आहेत. पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे स्वत:ची कार नाही. त्यांच्यावर एकूण 55 लाखांचे कर्ज आहे. त्यांची संपत्ती 142 कोटी रुपये आहे.

Crime News । धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, 17 महिला कैदी; पोलिसांनी धाड टाकली अन्…

सुप्रिया सुळे यांच्याकडे किती सोने, चांदी आहेत?

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे 11 कोटी 83 लाख 29 हजार 195 रुपये बँकेत जमा आहेत. त्यांच्याकडे 7 लाख 13 हजार 500 रुपयांची राष्ट्रीय बचत योजना आहे. याशिवाय सुप्रिया सुळे यांच्याकडे 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपयांचे सोने आहे. 4 लाख 53 हजार 446 रुपयांची चांदीही आहे. 1 कोटी 56 लाख 06 हजार 321 रुपये किमतीचा हिराही आहे. बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडेही शेतजमीन असून त्यांचे बाजारमूल्य 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये आहे.

Baramati Crime । बारामती हादरली! अल्पवयीन मुलांकडून विद्यार्थ्याची हत्या

Spread the love