Pune News । पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील माळीनगर या ठिकाणी लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. अवघ्या काही तासांनंतर वधू-वर विवाहबंधनात अडकणार होते, मात्र त्यापूर्वीच मोठी दुःखद घटना घडली आणि संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. घराजवळील विहिरीत वराचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का, बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश; फडणवीसांची घेतली भेट
ही आत्महत्या आहे की आणखी काही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत व्यक्ती एका खाजगी कंपनीत काम करत होता आणि त्याच्या लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 28 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नाच्या काही तासांपूर्वी तो घराजवळील विहिरीत बुडलेला आढळून आला. ही घटना मंगळवारी (१६ एप्रिल) घडली.
तळेगाव दाभाडे पोलिस अधिकारी म्हणाले, “वराच्या मामाने आम्हाला सांगितले की, मंगळवारी (16 एप्रिल) सकाळी त्याचा पुतण्या कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. त्यांच्या पुतण्याने त्यांना फोन करून लग्न करण्यात रस नसल्याचे सांगितले. तसेच आपण घरी परतणार नसल्याचे सांगितले. मृतदेह सापडल्यानंतरची परिस्थिती आणि कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा आम्हाला संशय आहे . अशी माहिती पोलिसांनी दिली.
Baramati Crime । बारामती हादरली! अल्पवयीन मुलांकडून विद्यार्थ्याची हत्या