Baramati Crime । बारामती हादरली! अल्पवयीन मुलांकडून विद्यार्थ्याची हत्या

Baramti Crime News

Baramati Crime । दिवसेंदिवस गुन्हेगारी ही वाढत चालली आहे.पुणे शहरात मागच्या काही दिवसापासून कोयता गँग सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आता ग्रामीण भागात देखील कोयता गॅंगची दहशत पसरत आहे. सध्या बारामतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारामती तालुका कोयता गँगच्या हल्ल्याने हादरला आहे.

Lok Sabha Election 2024 । लोकसभेच्या मतदानाला सुरवात, पोलिसांचा चोख बंदोबस्त; महाराष्ट्रातील ‘या’ 5 जागांवर आज होणार मतदान

या ठिकाणी अल्पवयीन मुलांनी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कोयत्याने वार करत हत्या केली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंडवडी सुपे परिसरात ही घटना घडली आहे. माहितीनुसार कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

Bjp । भाजपला मोठे टेन्शन, या ठिकाणी पहिल्यांदाच उभा केला उमेदवार

हा युवक कॉलेजमधून घरी कारखेलला निघाला होता यावेळी चार ते पाच जणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये विनोद गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियाणांवर मोठी शोककळा पसरली आहे. .गावातील एका महापुरूषांच्या जयंतीच्या वेळी झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे.

Supriya Sule। ‘घटस्फोट होऊन सहा महिने झाले, पण….” सुप्रिया सुळेंच सर्वात मोठं वक्तव्य

Spread the love