Rashmi Barve । जात प्रमाणपत्र अवैध असल्याने रामटेकच्या काँग्रेस (Congress) उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला होता. अशातच आता याच कारणामुळं त्यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झाले आहे. रश्मी बर्वे यांनी जितका काळ घालवला त्या काळातील त्यांच्यावर झालेला सरकारी खर्च वसूल केला जाईल. अशातच आता सुप्रीम कोर्टाचा रश्मी बर्वे यांना पुन्हा मोठा झटका बसला आहे. (Latest marathi news)
Sudhir Mungantiwar । सुधीर मुनगंटीवारांच्या अडचणीत होणार वाढ, नेमकं प्रकरण काय?
रश्मी बर्वे यांनी जात पडताळणीवर हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टानं रश्मी बर्वे यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने रश्मी बर्वे यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यावर अंतरिम स्थगिती दिली आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. याचा फटका साहजिकच आगामी निवडणुकीवर होऊ शकतो. अशातच आता पुन्हा एकदा काँग्रेसला आणि रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Raj Thackeray । बिग ब्रेकिंग! राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम