Maharashtra politics । महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता, खडसेंचे निकटवर्तीय भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra politics

Maharashtra politics । नंदुरबार : काही जागांवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच काही नाराज नेते पक्षाने तिकीट नाकारल्याने पक्षांतर करत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. कारण एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. (Latest marathi news)

Rashmi Barve । मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा रश्मी बर्वे यांना सर्वात मोठा धक्का

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी (Udesing Padavi) हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण उदेसिंग पाडवी हे आज महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी सूचक विधान केले आहे. “एकनाथ खडसे पंधरा दिवसानंतर भाजपमध्ये जाणार आहेत. पण त्याआधी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.”

Sudhir Mungantiwar । सुधीर मुनगंटीवारांच्या अडचणीत होणार वाढ, नेमकं प्रकरण काय?

“एकनाथ खडसे आम्हाला ज्यावेळेस बोलतील आणि आमच्या समोर त्यांची भूमिका मांडतील. त्यावेळेस आम्ही विचार करू,” असं विधान उदेसिंग पाडवी यांनी केले आहे. दरम्यान, खडसे यांना मानणारा नंदुरबार जिल्ह्यात मोठा गट आहे. असे असताना आता जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांना मानणारा वर्ग भाजपात घरवापसी करणार आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

Nana Patole Car Accident । ‘तो’ अपघात नाही, नाना पटोलेंना चिरडून मारण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा खळबळजनक दावा

Spread the love