
Sudhir Mungantiwar । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha election) रणधुमाळी सुरु आहे. अनेक पक्ष त्यांच्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. काही जागांवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच आता चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Latest marathi news)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेवेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये, असे सचिन सावंत म्हणाले आहेत.
Raj Thackeray । बिग ब्रेकिंग! राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम
आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) April 9, 2024
निवडणूक काळातील कोणत्याही गैरप्रकाराबद्दल आपण cVigil या अॅपवर तक्रार दाखल करू शकता. प्रत्येक तक्रारीवर १०० मिनीटांमध्ये पहिली कार्यवाही.
अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्याला भेट द्या.(1/2)
सावंत यांच्या या पोस्टवर उत्तर देताना निवडणूक आयोगाने ‘आपल्या तक्रारीची दखल घेतली आहे’ असे सांगितले आहे. निवडणूक काळातील कोणत्याही गैरप्रकाराबद्दल आपण cVigil या अॅपवर तक्रार दाखल करू शकता तसेच प्रत्येक तक्रारीवर १०० मिनीटांमध्ये पहिली कार्यवाही.अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्याला भेट द्या,असेही आयोगाने सांगितले आहे.
Nana Patole । मोठी बातमी! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात, गाडीचे मोठे नुकसान