Sujay Vikhe Patil । अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ, सुजय विखे पाटलांबद्दल तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil । राज्यात लोकसभेच्या निवडणुकांची जोरात तयारी सुरु आहे. राजकीय पक्ष ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. अशातच अहमदनगरमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अहमदनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत पार पडणार आहे.

Sushma Andhare । ठाकरे गटाला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का, बड्या नेत्यावर राज्य निवडणूक आयोगात तक्रार दाखल

सध्या सुजय विखे पाटील यांच्याबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुजय विखे पाटील यांची डिग्री बोगस असल्याचा धक्कादायक दावा सुजय विखेंचे सख्खे काका अशोक विखे यांनी केला आहे. विखेंच्याच कुटुंबातील व्यक्तीने विखे पाटील यांच्यावर टीका केल्याने अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

Havaman Andaj । ब्रेकिंग! काही तासांत या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरवात होणार; हवामान विभागाचा इशारा

अशोक विखे पाटील यांचा हा व्हिडीओ 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेतला आहे. यावेळी बोलताना अशोक विखेंनी अतिशय गंभीर आरोप केले होते. “सुजय यांची पदवी खासगी विद्यापीठातील असून खासगी विद्यापीठाचा दर्जा आपल्याला माहिती आहेच. शिवाय त्यांचे काही शिक्षण लोणीत झाले तेव्हा परीक्षा कशा दिल्या? याचीही आपल्याला माहिती आहे,” असाही दावा अशोक विखे पाटील यांनी केला आहे.

Sunetra Pawar । शरद पवारांच्या त्या विधानाने सुनेत्रा पवार दुखावल्या, माध्यमासमोरच लागल्या रडू

Spread the love