Sunetra Pawar । शरद पवारांच्या त्या विधानाने सुनेत्रा पवार दुखावल्या, माध्यमासमोरच लागल्या रडू

Sunetra Pawar

Sunetra Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रचारात मुलीऐवजी यंदा सुनेला निवडून द्या, असं मतदारांना आवाहन केलं होतं. यानंतर शरद पवारांनीही अजित पवार चुकीचं बोलले नाही. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असा टोला लगावला. शरद पवारांनी केलेली ही टीका अजित पवारांच्या पत्नी सूनेत्रा पवार यांच्या वर्मी लागली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

Delhi Crime । उत्तर-पूर्व दिल्लीत भरदिवसा तरुणाच्या डोक्यात गोळी झाडली, हल्लेखोर फरार

सुनेत्रा पवार का रडल्या?

सध्या बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुलगी विरुद्ध सून अशी लक्षात बारामती लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शरद पवार यांनी लोकांशी संवाद साधताना एक व्यक्त केलं ज्यामुळे सुनेत्रा पवार खूप दुखावल्या गेल्या आहेत.

Sharad Pawar । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर, शरद पवारांना धक्का; पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

बाहेरच्या पवारांना मतदान करू नका असं शरद पवार म्हणाले. यावेळी नकळत सुनेत्रा पवार यांनी बाहेरची असल्याचा उल्लेख केला आणि त्या दुखावल्या गेल्या. पत्रकारांनी यावेळी त्यांना प्रश्न विचारला असता सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. सुनेत्रा पवार यांनी रुमालाने डोळे पुसले आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेल्या.

Raj Thackeray । बिनशर्त पाठिंबा का? पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केला सर्वात मोठा खुलासा

Spread the love