Sushma Andhare । ठाकरे गटाला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का, बड्या नेत्यावर राज्य निवडणूक आयोगात तक्रार दाखल

Uddhav Thackeray

Sushma Andhare । ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. अशातच पुन्हा एकदा सुषमा अंधारे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुषमा अंधारे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Havaman Andaj । ब्रेकिंग! काही तासांत या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरवात होणार; हवामान विभागाचा इशारा

काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पूजा तडस यांनी कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी पूजा तडस यांना बाळ घेऊन बसवले होते. याच कारणावरून आता अंधारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sunetra Pawar । शरद पवारांच्या त्या विधानाने सुनेत्रा पवार दुखावल्या, माध्यमासमोरच लागल्या रडू

सुषमा अंधारे यांनी राजकीय फायदा आणि निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी ही तक्रार केली आहे. त्यामुळे अंधारे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, २०२० मध्ये खासदार रामदास तडस यांच्या मुलावर शारीरिक छळ आणि लैंगिक शोषणाचे आरोप पूजा तडस यांनी केले होते.

Delhi Crime । उत्तर-पूर्व दिल्लीत भरदिवसा तरुणाच्या डोक्यात गोळी झाडली, हल्लेखोर फरार

Spread the love