Ajit Pawar । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तारखा जाहीर झाल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान १९ तारखेला होणार असून यासाठी आता फक्त ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्येच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटातील बडा नेता पक्ष सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार गटाचे नेते संजीव राजे निंबाळकर (Sanjeev Raje Nimbalkar) आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जर संजीव राजे निंबाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज संध्याकाळी संजीव राजे निंबाळकर यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
Salman Khan । धक्कादायक बातमी! सलमान खानच्या घराबाहेर पहाटे गोळीबार
संजीव निंबाळकर हे रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांचे पुतणे आहेत. शरद पवार गटाकडून फक्त अजित पवार गटच नाही तर भाजपला देखील धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे देखील आज संध्याकाळी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. आज संध्याकाळीच त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.