
Crime News । छत्रपती संभाजीनगर : हल्ली सोशल मीडियाचा (Social media) वापर खूप वाढला आहे. जरी सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले तरी सोशल मीडियामुळे खूप नुकसान देखील होत आहेत. याच्या वापरामुळे अनेक गुन्हे देखील होत आहेत. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणीला सोशल मीडियाचा वापर खूप महागात पडला आहे. (Latest marathi news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणीवर अत्याचार (Crime in Chhatrapati Sambhajinagar) केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावरून २२ वर्षीय तरुणीशी एका युवकाने मैत्री केली. ही तरुणी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात आली होती. त्यानंतर त्या युवकाने तिला जेवणातून गुंगीचे औषध देऊन हॉटेलात नेले. तिथे तिच्यावर सतत अत्याचार केला.
हे प्रकरण इथवरच थांबले नाही. त्या युवकाने तरुणीचे आक्षेपार्य छायाचित्रे काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तसेच या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पण अजूनही आरोपी मोकाटच आहे.
Sharad Pawar । माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांना मोठा धक्का बसणार? बडा नेता बंडखोरीच्या तयारीत