Kirit Somayya | किरीट सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तोंड दाखवायला जागा राहिली नाही; बड्या नेत्याची टीका

Kirit Somayya

Anil Parab । राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांचा तिढा कायम आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचार सभेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यावर जहरी टीका केली आहे. (Anil Parab on Kirit Somayya)

Ahmednagar Accident । अहमदनगरमध्ये पहाटेच्या सुमारास पिकअपचा भीषण अपघात; चिमुकलीचा मृत्यू तर ३ जण जखमी

“किरीट सोमय्या यांच्या एका व्हिडीओनंतर त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. त्यांच्या अनेक भानगडी आहेत. या भानगडी पुढे एक ना एक दिवस बाहेर येतील. असा व्हिडीओ आल्यावर त्या विकृत माणसाला कोण साथ देणार? किरीट सोमय्यांचा वापर करून फायदा झाल्यावर भाजपने (BJP) त्यांना फेकून दिले आहे,” असा आरोपही अनिल परब यांनी केला आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांना मोठा धक्का बसणार? बडा नेता बंडखोरीच्या तयारीत

“किरीट सोमय्या हा माकड असून मदारी सांगेल तसं तो नाचतो. ज्याच्यावर आरोप करायला सांगितलं जातं त्याच्यावर आरोप करतो. त्यानंतर तो व्यक्ती भाजपमध्ये आल्यानंतर किरीट सोमय्याला बाजूला केलं जातं. जे काही भुंकणारे लोक आहेत, ते मनापासून हे काम करत नाहीत. ज्या माणसाने तुमच्यासाठी मार खाल्ला, आज त्याला त्याच्या बायका पोरांसमोर तोंड दाखवायला लाज वाटते,” असा टोला अनिल परब यांनी काढला आहे.

Crime News । थरकाप उडवणारी घटना! ९ महिन्यांच्या चिमुकलीसह पतीने केली पत्नीची गळा चिरुन हत्या

Spread the love