Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का! या पाच नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

Big shock to Sharad Pawar! These five leaders joined BJP

Sharad Pawar । राज्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे दिसत आहे. यामध्येच आता भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. (Politics News)

Ajit Pawar । अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले; “मी अजूनही दारूला स्पर्श केला नाही”

आमदार एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. भुसावळमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. (Sharad Pawar)

Crime News । माणुसकीला काळिमा! मुलानं इंटरकास्ट लग्न केलं म्हणून रागाच्या भरात आजीनं नातीसोबत केलं असं काही की..

भाजपच्या नगर सेवकांनी एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी अजित पवारांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला होता. मात्र आता यातील पाच जणांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक बोधराज चौधरी माजी, नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे त्याचबरोबर माजी नगर सेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील आणि प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Agriculture news | कीटकनाशकांमुळे मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात, फळबागांना बसेल फटका

Spread the love