Onion Rate । शेतकऱ्यांची चिंता वाढली, नाफेडकडून अजूनही कांद्याची खरेदी नाही

Farmers are worried, there is still no purchase of onions from Nafed

Onion Rate । नाशिक : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कांद्याचे दर (Onion Price) कोसळले आहेत. अशातच आता केंद्र सरकारकडून कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क (Export charges) आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीवर्ग आक्रमक झाला आहे. त्यामुळे सरकारने दोन लाख मेट्रीक टन कांदा (Onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आश्वासन देऊनही नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अजूनही नाफेडकडून (Nafed) कांद्यांची खरेदी सुरु झालेली नाही. (Latest Marathi News)

Ajit Pawar । अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले; “मी अजूनही दारूला स्पर्श केला नाही”

सध्या कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळं शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारकडून निर्यात शुल्क आकारल्यामुळे शेतकऱ्यांकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. त्यानंतर 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटल असा भाव देत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

Crime News । माणुसकीला काळिमा! मुलानं इंटरकास्ट लग्न केलं म्हणून रागाच्या भरात आजीनं नातीसोबत केलं असं काही की..

परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. निर्णय घेतल्यानंतर आठ दिवस उलटून गेले तरी नाफेडकडून कांद्याची खरेदी करण्यात आली नसल्याने सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत नाही. जर येत्या काही दिवसात कांद्याची खरेदी झाली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आणखी नुकसान सोसावे लागू शकते.

Agriculture news | कीटकनाशकांमुळे मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात, फळबागांना बसेल फटका

दरम्यान, नाफेडच्या कांदा खरेदी नियमावलीत अडचणी येत आहेत. लवकरच त्यात बदल केला जाईल. नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्यात यावा असा आग्रह नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी काल पत्रकार परिषदेत केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे नियमांमध्ये बदल कऱण्याची मागणी करणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केलं आहे.

Mobile Hacked Sign । तुमचाही फोन हॅक झालाय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Spread the love