Asia Cup 2023 । आशिया स्पर्धेपूर्वी रोहितचं मोठं विधान, म्हणाला; “पुढील दोन महिने…”

Rohit's big statement before the Asia tournament, said; "The next two months..."

Asia Cup 2023 । उद्यापासून पाकिस्तान आणि श्रीलंका या ठिकाणी आशिया कप 2023 स्पर्धेला (Asia Cup) सुरुवात होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे या सामन्यांकडे लक्ष लागले आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक (Asia Cup Timetable) काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले होते. दरम्यान, टीम इंडिया, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ या 6 संघाचा एकमेकांचा आमनासामना करणार आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का! या पाच नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

बंगळूर येथे सराव शिबिर संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) माध्यमांशी संवाद साधला. “सकारात्मक असो किंवा नकारात्मक, बाहेरून येणाऱ्या घटकांसाठी मी पुढील दोन महिन्यांसाठी दरवाजे बंद केले आहेत. या काळात शक्य तितका निर्धास्थ रहाणार आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये मला संघासह अविस्मरणीय आठवणी निर्माण करायच्या आहेत, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले आहे.

Onion Rate । शेतकऱ्यांची चिंता वाढली, नाफेडकडून अजूनही कांद्याची खरेदी नाही

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहितने सर्वात जास्त पाच शतकांचा विक्रम केला होता. कोणताही खेळाडू असो त्याचे यश-अपयश एका रात्रीमध्ये बदलत नाही. दरम्यान, आशिया स्पर्धेसाठी एकूण 6 संघांना 2 गटात विभागलं आहे. टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ ए ग्रुपमध्ये आहे आणि बी ग्रुपमध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेशचा समावेश आहे.

Ajit Pawar । अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले; “मी अजूनही दारूला स्पर्श केला नाही”

असा आहे आशिया कपसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव,हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, आणि प्रसिद्ध कृष्णा

Crime News । माणुसकीला काळिमा! मुलानं इंटरकास्ट लग्न केलं म्हणून रागाच्या भरात आजीनं नातीसोबत केलं असं काही की..

Spread the love