Crime News । माणुसकीला काळिमा! मुलानं इंटरकास्ट लग्न केलं म्हणून रागाच्या भरात आजीनं नातीसोबत केलं असं काही की..

Crime News

Crime News । स्वत:साठी मनासारखा जोडीदार निवडणं हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. परंतु जोडीदार निवडत असताना जात-धर्माचे अडथळे येतात. या सगळ्यांना झुगारुन, पालकांना समजावून किंवा त्यांचा विरोध पत्करुन लग्न केलं तरी त्या जोडप्याला समाज स्वीकारून घेतोच असे नाही. अनेकदा त्यांच्या घरचे त्यांना स्वीकारत नाही. मुलानं इंटरकास्ट लग्न (Intercast marriage) केलं म्हणून रागाच्या भरात त्याच्या आईने टोकाचा निर्णय घेतल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. (Latest Marathi News)

Agriculture news | कीटकनाशकांमुळे मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात, फळबागांना बसेल फटका

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील सोनीपतच्या भदाना या ठिकाणी राहत असणाऱ्या राजेंद्र या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका महिलेशी आंतरजातीय विवाह केला होता. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब त्याच्यावर नाराज होते. त्यांच्यात सारखे वाद होत होते. तो काही दिवसांसाठी आपल्या पत्नी आणि मुलीसह घरी आला होता. तेव्हा देखील त्याच्या कुटुंबात लग्नावरून वाद झाला.

Mobile Hacked Sign । तुमचाही फोन हॅक झालाय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

पाहता पाहता हा वाद खूप टोकाला गेला. रागाच्या भरात त्या महिलेने अगोदर सुनेसोबत भांडण केले. मुलगा आणि सुनेला पकडून त्यांच्या डोळ्यांदेखत अवघ्या तीन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर आपटून तिची हत्या केली. महिलेने आपल्या पतीच्या सांगण्यावरून माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले. याप्रकरणी राजेंद्र यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रारीवरून त्याची आई, वडील आणि भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

Sana Khan । सना खान हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, मृतदेहाच्या शोधासाठी घेतला मोठा निर्णय

Spread the love