Sharad Mohol । पुण्यातील शरद मोहोळ याची हत्या झाल्यापासून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता शरद मोहोळ हत्या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या आता दहा झाली आहे. (Sharad Mohol Murder Case Update)
Cricketer Death News । क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा! खेळताना ३ क्रिकेटपटूंचा मैदानातच मृत्यू
पोलिसांनी ज्या दोन आरोपींना अटक केली आहे त्या दोन्ही आरोपींनी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल आरोपींना पुरवले असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय मारुती भटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
Aditya Thackeray । दुचाकीची धडक, अपघातग्रस्त तरुणांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे
शरद मोहोळच्या हत्येचे कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोळकरचे शरद मोहोळ याच्यासोबत मोठे वाद झाले होते. जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून या दोघांचे वाद झाले होते. त्याचबरोबर पोळेकर याला आपल्या मामाच्या अपमानाचा बदला देखील घ्यायचा होता. यासाठी पोळेकर याने हे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
दरम्यानम, पुण्यात ५ जानेवारी रोजी रक्तरंजीत थरार घडला. भर दिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर पोलीस तपासाला वेग आला असून या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. याप्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या चौकशी सुरू आहे. याबाबत अनेक धक्कादाय खुलासे देखील आरोपी करत आहेत.
Viral Video । चोरीचा आरोप, बॉईज हॉस्टेलमध्ये दोन मित्रांमध्ये तुफान हाणामारी; पाहा Video