NCP Political Crisis । ब्रेकिंग! राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? निवडणूक आयोगाचा निकाल येणार कुठल्या क्षणी, नेत्यांची धाकधूक वाढली

Ajit Pawar And Sharad Pawar

NCP Political Crisis । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. यानंतर या दोन्ही गटांनी पक्षावर आणि चिन्हावर आपला दावा दाखवला. दरम्यान आता राष्ट्रवादी नेमकी कोणाची? त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नेमके कोणाला मिळणार याबाबतचा निवडणूक आयोगातील निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो.

Sharad Mohol । ब्रेकिंग! गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी २ आरोपींना अटक; धक्कादायक माहिती समोर

राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा होती की, हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल मात्र अजूनही निकाल आलेला नाही. निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष नेमका कोणाचा? याबाबत आपल्याला स्पष्ट समजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर सुरू झालेली सुनावणी आठ डिसेंबरला पूर्ण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला होता. मात्र अद्याप निवडणूक आयोगातील ऑर्डर येणे बाकी आहे.

Cricketer Death News । क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा! खेळताना ३ क्रिकेटपटूंचा मैदानातच मृत्यू

त्यामुळे आता लवकरच अजित पवार गटाला की नेमक शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळणार हे स्पष्ट होणार आहे. या संदर्भात लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांची धाकधूक वाढली असल्याचे बोलले जात आहे.

Aditya Thackeray । दुचाकीची धडक, अपघातग्रस्त तरुणांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे

Spread the love