Pune Fire News । ब्रेकिंग! पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आग; दोन तरुणांचा होरपळून मृत्यू

Pune Fire News

Pune Fire News । मागच्या काही दिवसातपासून पुण्यामध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड सह पुण्यातील काही भागात सतत आग लागल्याच्या घटना घडतच आहेत. सध्या देखील पिंपरी चिंचवड शहरातील एका गोदामाला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange । मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा पुण्यात धडकला, ‘या’ ठिकाणी करणार दुपारचे जेवण

या आगीची माहिती तेथील स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी याबाबत माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र या आगीत दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ulhas Patil । काँग्रेसने निलंबन केल्यानंतर उल्हास पाटील यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पिंपरी चिंचवड येथील वाल्हेकर वाडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी या ठिकाणी अनाधिकृत पोटमाळे आहेत. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका पोटमाळ्यातील गोदामाला अचानक भीषण आग लागली आणि यावेळी दोन तरुण पोटमाळ्यावर अडकून पडले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

PM Suryoday Yojana । अयोध्येतून परतल्यानंतर PM मोदींनी घेतला सर्वात मोठा निर्णय! १ कोटी लोकांना मिळणार गिफ्ट

या आगीची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी त्या दोन तरुणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आगीने मोठे रौद्ररूप धारण केले होते. धुरात घुसमटून दोन्ही तरुण बेशुद्ध झाले आणि त्यांचा यामध्ये मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

Shiv sena Mla Disqualification। एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाच्या 40 आमदारांना नोटीस

Spread the love