Royal Enfield । ‘या’ मंदिरात देवाची नाही तर चक्क बुलेट बाईकची केली जाते पूजा; इतिहास वाचून व्हाल धक्क

Viral News

Royal Enfield । मंदिराचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर सर्व देवी देवतांचे फोटो समोर येतात. अनेक जण गणपती बाप्पा, राम-सीता, श्रीकृष्ण-राधा, शंकर भोलेनाथ, बजरंग बली हनुमान, काली माता, दुर्गा माता अशा अनेक वेगवेगळ्या देवतांचे दर्शन घेत असतो. जो तो व्यक्ती ज्याच्या त्याच्या परीने देवावर श्रद्धा ठेवतो. सध्या आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. (Viral News )

Abdul Sattar । गौतमीच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांकडून थेट शिवीगाळ! व्हिडिओ व्हायरल

राजस्थानमध्ये असे एक मंदिर आहे ज्या ठिकाणी कोणत्याच देवाच्या मूर्तीची पूजा होत नाही तर त्या ठिकाणी चक्क बुलेट बाईकची पूजा केली जाते. वाचून तुम्ही चकित झालात ना? मात्र ही गोष्ट खरी आहे. या मंदिराला ओम बन्ना मंदिर म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर काहीजण बुलेट बाबा असे देखील म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात या मंदिरात बुलेट बाईक ची पूजा का केली जाते?

Navi Mumbai Fire । मुंबईत अग्नितांडव! केमिकल कंपनीला भीषण आग

जोधपुर आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या नॅशनल हायवे वर एक चोटीला नावाचं गाव आहे. या गावामध्ये मंदिरात बुलेट बाईकची पूजा केली जाते. या मंदिरामध्ये रॉयल इन्फिल्ड या बाईची पूजा केली जाते. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बाईकमध्ये एक वेगळ्याच प्रकारची शक्ती आहे. त्यामुळे या ठिकाणाहून जाणारे प्रवासी या बुलेट बाईकचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जण तर या ठिकाणी नवस देखील करतात आणि नवस पूर्ण ही होतात. असं गावकऱ्यांचे म्हणणं आहे.

Sushma Andhare । ब्रेकिंग! ठाकरे गटाला मोठा धक्का; सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल

बुलेटची पूजा का केली जाते?

त्याचं झालं असं की १९८८ मध्ये एका तरुणाचा बाईकवर प्रवास करताना अपघातात झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी तपास करण्यासाठी बाईक जप्त केली मात्र यामधील आश्चर्याची बाब म्हणजे ही बाईक रात्रीची पोलीस स्टेशन मधून गायब झाली आणि दुसऱ्या दिवशी घटनास्थळी सापडली यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा बाईक पोलीस स्टेशनमध्ये नेली मात्र पुन्हा तोच प्रकार घडला. त्यानंतर या बाईकमध्ये शक्ती आहे असे गावकऱ्यांची मान्यता झाली आणि तेव्हापासून गावकरी त्या बाईकची पूजा करू लागले.

Jitendra Awhad । जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य! ठाण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात तुफान राडा

Spread the love