Sushma Andhare । ब्रेकिंग! ठाकरे गटाला मोठा धक्का; सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल

Sushma Andhare

Sushma Andhare । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मालेगाव तालुक्यात अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Arvind Kejriwal । मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अटक होणार?

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे हे आपल्या बेधडक वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्या आपल्या शैलित विरोधकांवर कायमच टीका करतात. मागच्या काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी हिंदू धर्मीयांचे पवित्र देवता श्री राम व श्रीकृष्ण यांच्या संबंधित जाणून-बुजून ही दर्जाचा शब्दप्रयोग केला होता. यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असा आरोप त्यांच्यावर आहे.

Iran Explosion News । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! इराण स्फोटाने हादरलं, 105 जणांचा मृत्यू

सुषमा अंधारे यांच्यावर मालेगावात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. माहितीनुसार, अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Jitendra Awhad । ब्रेकिंग! “राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता” जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

Spread the love