Rohit Pawar News । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते सभांचे आयोजन करतआहेत. प्रचाराचा धडका देखील सुरू आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
Viral News । तरुण नदीत पोहताना अचानक मगरीने हल्ला केला, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
अक्षय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अक्षय शिंदे यांना रोहित पवार यांचे कट्टर समर्थक होते. मात्र काही दिवसांपासून रोहित पवार आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी आता अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय.
Adani Group | उद्योगपती अदानी यांना सर्वात मोठा धक्का; 6 कंपन्यांना सेबीकडून नोटीस