Rohit Pawar । राजकीय वर्तुळात खळबळ! रोहित पवारांनी फडणवीसांवर केला धक्कादायक आरोप

Rohit Pawar । राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची असणार आहे. काही मतदारसंघ यंदा खूप चर्चेत येत आहेत. त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ होय. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केला आहे. (Loksabha election 2024)

Prajwal Revanna । महिला रडत सुटकेची विनंती करत होत्या, तरीही माजी पंतप्रधानांचा मुलगा व्हिडीओ बनवत राहिला; वाचून बसेल धक्का

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मतांसाठी ब्लॅकमेलिंग करत असल्याचा धक्कादायक दावा रोहित पवार यांनी केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याच्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिजीत पाटलांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी तुम्ही आमचं काम करा आम्ही तुमचं काम करतो, अशी प्रतिक्रिया दिली.

Viral News । मुलगा झाला हैवान! बापाला केली लाथा-बुक्यांनी मारहाण, वृद्धाचा जागीच मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडीओ

यावरूनच आता रोहित पवार यांनी फडणवीस आणि भाजपवर जहरी टीका केली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या रोहित पवार यांची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. हीच राजकीय ब्लॅकमेलिंगची प्रवृत्ती माढा मतदारसंघातले लोक यंदा मातीत गाडणारा आणि भाजपला पाडणार!, असं कॅप्शन देत रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

Viral News । बहिणीच्या हळदीत नाचताना मुलीचा जागीच मृत्यू, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love