Asaduddin Owaisi । “मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात”, ओवैसींचा मोदींवर ‘त्या’ वक्तव्यावरून निशाणा

Asaduddin Owaisi । राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची असणार आहे. काही मतदारसंघ यंदा खूप चर्चेत येत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक प्रत्येक मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मुस्लिम समाजावर टीका केली होती, त्याला आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Rohit Pawar । राजकीय वर्तुळात खळबळ! रोहित पवारांनी फडणवीसांवर केला धक्कादायक आरोप

“मुस्लीम लोक जास्त मुलांना जन्म देतात असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पण नरेंद्र मोदी यांना सहा भाऊ तर अमित शहा (Amit Shah) यांना सहा बहिणी आहेत. तसेच राष्ट्रीय संव्यसेवक संघाच्या प्रमुख्यांना 10 ते 12 बहिण भाऊ आहेत. मुस्लीम समाजातील जन्मदराचा आलेख हा घसरता आहे असे केंद्र सरकारच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे, असं ओवैसी यांनी स्पष्ट केले.

Prajwal Revanna । महिला रडत सुटकेची विनंती करत होत्या, तरीही माजी पंतप्रधानांचा मुलगा व्हिडीओ बनवत राहिला; वाचून बसेल धक्का

“समाजामध्ये मोदी हे द्वेष पसरण्याचं काम करत आहेत. द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुस्लीम लोक सर्वात जास्त मुलं जन्माला घालतात, अशी भीती पसरवली जातेय. पण केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लीम लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला कसलाही संकोच वाटत नाही,” असा दावा ओवैसी यांनी केला आहे.

Viral News । मुलगा झाला हैवान! बापाला केली लाथा-बुक्यांनी मारहाण, वृद्धाचा जागीच मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Spread the love