Ravindra Waikar । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! आमदार रवींद्र वायकर करणार शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray

Ravindra Waikar । सध्या राज्याच्या राजकारणात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. मागच्या काही दिवसापासून अनेक बडे नेते पक्षांतर देखील करत आहेत. त्यामुळे कोणता नेता कधी पक्ष सोडेल हे काही सांगता येत नाही. मागच्या काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान आज संध्याकाळी रवींद्र वायकर हे वर्षा निवासस्थानी दाखल होऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Akola News । काळीज सुन्न करणारी घटना! शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून नववीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

रवींद्र वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र वायकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. (Ravindra Waikar Join Shiv Sena)

Rohit Pawar । रोहित पवारांचं अजित पवारांना सर्वात मोठं चॅलेंज; म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रवींद्रनाथ वायकर यांचा जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त सापडला असून लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Supriya Sule । असं काय झालं की सुप्रिया सुळेंनी मानले अजितदादांचे आभार…

Spread the love