Rohit Pawar । रोहित पवारांचं अजित पवारांना सर्वात मोठं चॅलेंज; म्हणाले…

Rohit Pawar

Rohit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Chandra Pawar Party) आमदार रोहित पवार हे सध्या अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण त्यांच्यावर ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. बारामती अॅग्रो’ कंपनीशी संबंधित 50 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यावरून पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)

Supriya Sule । असं काय झालं की सुप्रिया सुळेंनी मानले अजितदादांचे आभार…

रोहित पवार म्हणाले की, “युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने 800 कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला, अशी जहरी टीका काहींजणांनी केली होती. त्यांना असं सांगायच आहे की, बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या मित्राबरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे देखील सांगण्याचं माझ्यात धाडस आहे,” असं रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Lok Sabha Elections । ब्रेकिंग! महाराष्ट्रात जागांवर चर्चा नाही! एकनाथ शिंदे भाजप सोडणार का?

“पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या धरणातून सिंचन करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का?” असा सवाल रोहित पवार यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) विचारला आहे. अशातच आता रोहित पवार यांच्या या आव्हानानंतर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटलांवर पुण्यात गुन्हा दाखल, समोर आलं मोठं कारण

Spread the love