Jayant Patil । “…त्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही” जयंत पाटील यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Jayant Patil

Jayant Patil । केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. सर्व पक्ष निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीसाठी जोमाने तयारी करताना दिसत आहे. सध्या जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचं जागावाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

Ravindra Waikar । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! आमदार रवींद्र वायकर करणार शिंदे गटात प्रवेश

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार? लोकसभेसाठी उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? याबाबत जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, आमची यादी तयार आहे. चर्चा चांगली झाली आहे. जागावाटपाबाबत वंचितशी पूर्ण झाल्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही. त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील असा विश्वास आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Akola News । काळीज सुन्न करणारी घटना! शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून नववीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Spread the love