Akola News । काळीज सुन्न करणारी घटना! शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून नववीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Akola News

Akola News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पंधरा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातून ही बातमी समोर आली आहे. दोन शालेय शिक्षकांकडून मारहाण आणि मानसिक त्रास होत असल्याने या विद्यार्थ्यांने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

Rohit Pawar । रोहित पवारांचं अजित पवारांना सर्वात मोठं चॅलेंज; म्हणाले…

आत्महत्या करणारा विद्यार्थी हा नववीच्या वर्गात शिकत असून त्याला मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास होता. शाळेतील दोन शिक्षक त्याला सतत मारहाण करत मानसिक त्रास द्यायचे आणि याच त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्याच्या पालकांनी म्हटले आहे. (Akola News)

Supriya Sule । असं काय झालं की सुप्रिया सुळेंनी मानले अजितदादांचे आभार…

काल शाळेमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी शाळेतील दोन महिला शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला शाळेतून काढून टाकण्याची देखील धमकी देण्यात आली असं विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हटल. हा सर्व घडलेला प्रकार विद्यार्थ्याने सायंकाळी घरी आल्यानंतर आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यावेळी आई-वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर सायंकाळी राहत्या घरी वरच्या खोलीमध्ये तो अभ्यासासाठी जात असल्याचे सांगून गेला आणि त्या ठिकाणी आत्महत्या केली.

Lok Sabha Elections । ब्रेकिंग! महाराष्ट्रात जागांवर चर्चा नाही! एकनाथ शिंदे भाजप सोडणार का?

Spread the love