Nilesh Lanke । निलेश लंके यांना उमेदवारी का दिली? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Radhakrishn Vikhe Patil

Nilesh Lanke । सध्या लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections) सगळीकडे धामधूम पाहायला मिळत आहे. यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघ देखील चर्चेत आहे. या मतदारसंघांमध्ये विखे आणि लंके अशी राजकीय लढत फिक्स झाले आहे. यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विखे की लंके नेमका कोणाचा विजय होणार? याच्या देखील चर्चा सुरु आहेत. मात्र विजय नेमका कोणाचा होईल याचा अंदाज बांधणे देखील कठीण असेल. असे राजकीय जानकर सांगत आहेत.

Rashmi Barve । लोकसभेपूर्वीच काँग्रेसला धक्क्यांवर धक्के! अर्जानंतर बड्या नेत्याचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द

दरम्यान, निलेश लंके यांची उमेदवारी फिक्स झाल्यानंतर खासदार विखे पाटील यांचे वडील अर्थात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेऊन नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर फडणवीस यांची भेट घेत नाराज असणाऱ्या स्वपक्षांना आपलेसे करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. दरम्यान आता राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी निलेश लंके (Nilesh Lanke ) यांचे नाव न घेता त्यांच्यावर व शरद पवार यांच्याबाबत राजकीय वक्तव्य करत गौप्यस्फोट केला आहे.

Unmesh Patil । राजकीय हालचालींना वेग! उन्मेश पाटलांच्या ठाकरे गटातील प्रवेशापूर्वी ‘त्या’ बॅनरवरून चर्चांना उधाण

मागच्या वेळी आमची लढत शरद पवार यांच्याशी होती. यावेळी शरद पवार अहमदनगर मतदारसंघात तळ ठोकून बसले होते. मात्र यावेळी त्यांचे काही चालले नाही. मागच्यावेळी सुजय विखे पाटील विजयी झाले व मोदी लाटेपुढे शरद पवार निष्प्रभ ठरले होते. असे विखे म्हणाले आहेत.

Urfi Javed । गरम होतंय म्हणून उर्फीने विमानातळावरच काढले कपडे; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल; पाहा VIDEO

त्याचबरोबर, पुढे निलेश लंके यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, “आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिली असली तरी याचा परिणाम आमच्या मतांवर होणार नसून भाजपच्या यंत्रणेपुढे सर्व काही पुन्हा एकदा निष्प्रभ ठरेल” असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Fire । छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love