
Raosaheb Danve Accident | लोणावळा – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या वाहनाला लोणावळ्यातील जयचंद चौक परिसरात एका दुचाकीने जोरदार धडक दिली. या घटनेनंतर दुचाकीस्वार आणि दानवे यांच्यात वाद झाला. घटनास्थळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता, मात्र स्थानिक रिक्षाचालकांनी प्रसंगात हस्तक्षेप करत दोघांनाही शांत केलं.
Pahalgam Terror Attack । पहलगाम हल्ल्याचा निषेध; दहशतवाद्यांची माहिती दिल्यास २० लाखांचं बक्षीस
घटनेच्या वेळी रावसाहेब दानवे स्वतः कारमध्ये होते, मात्र सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. दुचाकीस्वाराने अचानक रस्त्यात चुकीच्या दिशेने गाडी चालवत येत कारला धडक दिली, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या अपघातामुळे स्थानिक सुरक्षेच्या व्यवस्थेचा बुरखा फाटला आहे. जयचंद चौक ही परिसरातील एक गजबजलेली आणि महत्त्वाची जागा असूनही येथे पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत होते. काही व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानांसाठी बसवलेले खासगी कॅमेरेच एकमेव साधन ठरले.
Diplomatic Strike l भारताची पाकिस्तानवर कडक कारवाई; घेतले पाच मोठे निर्णय
नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचे सीसीटीव्ही बंद असणे ही गंभीर बाब असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी, या घटनेने सार्वजनिक सुरक्षेबाबत अधिक जागरूक होण्याची गरज अधोरेखित केली आहे. नागरिकांनी पोलिस व नगरपालिका प्रशासनाकडे लवकरात लवकर सीसीटीव्ही यंत्रणेची दुरुस्ती करून ती कार्यरत करण्याची मागणी केली आहे.
Politics News । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक