Politics News । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक

Sharad Pawar And Ajit Pawar

Politics News । राज्याच्या राजकारणात सध्या मोठी हालचाल सुरू आहे. विशेषतः पवार कुटुंबातल्या वाढत्या भेटींमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. नुकतीच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात एक बंद दरवाजामागे बैठक पार पडली. ही बैठक साखर संकुलात झाली होती, जिथे कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरासंदर्भात एक तांत्रिक चर्चा आधी पार पडली. या बैठकीनंतरच शरद पवार यांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये सुमारे २० मिनिटे खास चर्चा झाली.

Cashless Treatment l अपघातग्रस्त रुग्णांसाठी राज्य सरकारकडून दिलासा – कॅशलेस उपचार योजनेची घोषणा

गेल्या पंधरवड्यात शरद पवार आणि अजित पवार हे चौथ्यांदा एकत्र भेटले आहेत. याआधी वसंतदादा इंस्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था आणि जय पवार यांच्या साखरपुडा सोहळ्यात हे दोघे एकत्र दिसले होते. प्रत्येक वेळी थोडक्यात का होईना, पण संवाद झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का?

Beed News । धक्कादायक! बीडमध्ये महिलेला सरपंचासह १० जणांनी केली बेदम मारहाण

या बैठकीत नक्की काय चर्चा झाली यावर अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, उपस्थित काही अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं आहे की दोघांमध्ये सुसंवाद झालाय. यामुळेच ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व पक्ष आणि कुटुंबीयांनी एकत्र येणं गरजेचं आहे.” त्यांच्या या विधानामुळेही एकत्र येण्याच्या शक्यतांना बळ मिळालं आहे.

Ranjit Kasle Dismissed l सर्वात मोठी बातमी! रणजित कासलेंना मोठा झटका, पोलिसांनी उचलल मोठं पाऊल

Spread the love