Ranbir Kapoor । बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो त्याच्या चित्रपटामुळे त्याचबरोबर त्याच्या खाजगी आयुष्यामुळे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. मात्र सध्या रणबीर कपूरच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवल आहे. त्यामुळे रणबीर कपूर याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Ranbir Kapoor Viral Video)
माहितीनुसार, रणबीरला आज ईडी समोर हजर व्हायचे होते. मात्र रणबीर कपूर हा आज ईडी समोर हजर झाला नाही. याबाबत रणबीरने ईडीला एक मेल केला आहे आणि पर्सनल कारण देत वेळ मागितला आहे. रणबीर कपूरचे नाव थेट महादेव गेमिंग मध्ये आले आहे. त्यामुळे आता चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणांमध्ये रणबिर कपूर याचे पाय खोलात असल्याचे देखील बोलले जात आहे.
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांनी केली सर्वात मोठी मागणी; म्हणाले, “शिंदे सरकारची…”
फक्त रणबीर कपूरच नाही तर पंधरा ते वीस बॉलीवूड कलाकारांचा देखील मनी लॉन्ड्री प्रकरणात समावेश आहे. सध्या रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून लोकांना मोठा धक्का बसला. हा व्हिडीओ पाहून रणबीर कपूर याच्यावर टीका केली जात आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर भडकलेला दिसतोय.
Viral Video | संतापजनक! जेवणाला उशीर झाला म्हणून सासऱ्याने केली सुनेला बेदम मारहाण, पाहा VIDEO
यावेळी पापरांझी रणबीर कपूरला आवाज देत होते. मात्र पापरांझी यांच्याकडे दुर्लक्ष करून रणबीर थेट पुढे निघून जाताना दिसला. त्यानंतर रणबीर कपूर पापरांझी यांच्यावर भडकत म्हणाला, आत मध्ये येऊ नका. त्यानंतर रणबीर कपूर त्या ठिकाणाहून निघून गेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
IND vs AUS World Cup 2023 । टीम इंडियाला मोठा धक्का! प्रमुख खेळाडूला झाली डेंग्यूची लागण