Viral Video | संतापजनक! जेवणाला उशीर झाला म्हणून सासऱ्याने केली सुनेला बेदम मारहाण, पाहा VIDEO

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर दररोज अनेक तऱ्हेतऱ्हेचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ अगदी गमतीशीर असतात. तर काही व्हिडिओ अतिशय धक्कादायक देखील असतात. सध्या देखील पाकिस्तानमधील एक संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका सासऱ्याने त्याच्या सुनेला मारहाण केल्याचे पाहायला मिळत आहे.

Animal husbandry । आलिशान कारपेक्षा महाग म्हैस! किंमत जाणून व्हाल थक्क

उशिरा जेवण दिल्यामुळे सासर्‍याने सुनेला अक्षरशः लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या शेखपुरा या ठिकाणचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. तुम्ही या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ती व्यक्ती महिलेला निर्दयपणे मारहाण करत आहे. व्यक्ती महिलेच्या लाटणे डोक्यात तर कधी हात पायांवर कसाही मारत आहे.

Success story । MBA चायवाला नंतर MBA कोंबडीवाल्याची चर्चा! महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल

यामधील आणखीन एक काळीज पिऊन टाकणारं चित्र म्हणजे त्या महिलेची लहान मुलं त्या व्यक्तीला मारू नका, मारू नका म्हणत रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तरी ती व्यक्ती मुलांना ढकलत त्या महिलेला वारंवार मारत आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वजण यावर संताप व्यक्त करत आहेत.

Crime News । “पहिल्यांदा इंस्टाग्रामवर ओळख करायचा नंतर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार करायचा अन् पैसेही..” आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love