IND vs AUS World Cup 2023 । टीम इंडियाला मोठा धक्का! प्रमुख खेळाडूला झाली डेंग्यूची लागण

ND vs AUS World Cup 2023

IND vs AUS World Cup 2023 । चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर टीम इंडिया येत्या रविवारी पहिला वनडे वर्ल्ड कप मधील सामना खेळणार आहे. मात्र या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला असल्याची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका प्रमुख खेळाडूला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Vs Sharad Pawar । खरी राष्ट्रवादी कोणाची? अजित पवार की शरद पवार? आज होणार महत्त्वाची सुनावणी

माहितीनुसार टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलला डेंग्यूची लागण (Shubman Gill infected with dengue) झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आपला पहिला सामना या खेळाडू शिवाय खेळावा लागू शकतो. यामुळे टीम इंडियाला वर्ल्डकपच्या सुरुवातीलाच हा मोठा झटका बसला आहे. (IND vs AUS World Cup 2023)

Crime News । “पहिल्यांदा इंस्टाग्रामवर ओळख करायचा नंतर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार करायचा अन् पैसेही..” आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शुभमन गिल हा खेळाडू गुरुवारी ट्रेनिंग सेशन मध्ये देखील सहभागी झाला नव्हता. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या खेळाडूची टीम मॅनेजमेंट विशेष काळजी देखील घेत आहे. त्यामुळे आता हा खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार की नाही याचा निर्णय शुक्रवारी एक टेस्ट होईल त्यानंतर घेतला जाणार आहे. शुभमन गिल हा टीम इंडियाचा भरवशाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला डेंग्यूची लागण झाल्यामुळे संपूर्ण टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Goregaon Fire । धक्कादायक बातमी! मुंबईमधील गोरेगावातील पाच मजली इमारतीला भीषण आग; ६ जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी

जर शुभमन गिल खेळणार नसेल तर त्याच्या जागी दुसरा ओपनिंग पार्टनर निवडण्याचं आव्हान आता रोहित शर्मा समोर असेल. शुभमन गिलच न खेळणं ही टेन्शनची बाब आहे. कारण सध्या तो शानदार फॉर्ममध्ये आहे. नुकताच गिलने 24 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार शतक झळकावले होते.

Supriya Sule । अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावर पहिला हार मी घालेन; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा

Spread the love