Accident News । मोठी बातमी! माळशेज घाटात ट्रक आणि बसची भीषण धडक; २० प्रवासी गंभीर जखमी

Accident News

Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, कल्याण या ठिकाणाहून शिरोळीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Crime News । मुलीसोबत बोलण्यास मनाई केली म्हणून दोन विद्यार्थ्यांना राग अनावर… शिक्षकावरच झाडली गोळी; व्हिडिओ केला व्हायरल

या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या जखमी रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून देखील रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Ranbir Kapoor । मोठी बातमी! अभिनेता रणबीर कपूरचा ‘तो’ व्हिडिओ पाहून लोक हैराण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही कल्याण या ठिकाणाहून शिरोळीच्या दिशेने निघाली होती. या बस मध्ये जवळपास 25 प्रवासी प्रवास करत होते. मात्र अचानक समोररून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच उलटला.

Kisan Yojana । पशुपालकांनो..! त्वरित करा पशु शेड योजनेसाठी अर्ज, सरकार देतंय 1 लाख 60 हजार रुपये

Spread the love