Lok Sabha Election । अहमदनगरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; सुजय विखेंसाठी राम शिंदे….

Lok Sabha Election

Lok Sabha Election । जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच तापत आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहे. अशातच राजकीय वर्तुळातून खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)

Ashok Chavan । राजकारणातून मोठी बातमी! अशोक चव्हाण यांचा काँग्रेस संपवण्याचा प्लॅन होता, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यातील वाद आता मिटले आहेत. आज भाजपकडून (BJP) अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी (Ahmednagar Lok Sabha Constituency) महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी दोन्ही नेत्यांमधील असणारे मतभेद दूर झाले आहेत. राम शिंदे यांनी सुजय विखेंसाठी प्रचारात उतरणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

MNS । धक्कादायक बातमी! मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांची एकाला बेदम मारहाण

दरम्यान, राम शिंदे यांना अहमदनगर लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवायची होती. पण भाजपने राम शिंदे यांना उमेदवारी न देता सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राम शिंदे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दाखल घेतली. आज अखेर राम शिंदे आणि सुजय विखे यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत.

Maharastra Politics । ब्रेकिंग! राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

Spread the love