Vasant More । सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या (Loksabha election) याद्या जाहीर करत आहेत. पण पक्षाने तिकीट नाकारल्याने अनेक नेतेमंडळी पक्षांतर करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला. त्यानंतर वसंत मोरेंच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अशातच वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. (Latest marathi news)
Lok Sabha Election । अहमदनगरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; सुजय विखेंसाठी राम शिंदे….
वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून यापूर्वी 19 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तर आता आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर केली आहे. यात पुण्यातून वसंत मोरे, नांदेडमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले आणि शिरुर मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे. (Ravindra Dhangekar vs Vasant More)
वंचितने वसंत मोरे यांच्या रुपाने पुण्यात तगडा उमेदवार मैदानात उतरवला असल्याने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा म्हणून परिचित होते. इतकेच नाही तर ते सोशल मीडियामुळे देखील सतत चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे आता अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
MNS । धक्कादायक बातमी! मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांची एकाला बेदम मारहाण