Ashok Chavan । राजकारणातून मोठी बातमी! अशोक चव्हाण यांचा काँग्रेस संपवण्याचा प्लॅन होता, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Ashok Chavan

Ashok Chavan। जसजशा निवडणुका (Loksabha election) जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच तापत आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नुकताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. पण आता काँग्रेसच्या बड्या नेत्याने अशोक चव्हाणांबाबत (Ashok Chavan) एक अजब दावा केला आहे. (Latest marathi news)

MNS । धक्कादायक बातमी! मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांची एकाला बेदम मारहाण

आज नाना पटोले (Nana Patole) भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जहरी टीका केली. “अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर बोलू नये. त्यांनी काँग्रेसच्या नावावर खूप कमावलं. काँग्रेसला कसं संपवायचं याचा अशोक चव्हाण यांनी प्लॅन केला होता”, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole vs Ashok Chavan)

Maharastra Politics । ब्रेकिंग! राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

“ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याचं आईची जर तुम्ही बदनामी करायला निघाला तर लोकं तुम्हाला माफ करणार नाही. काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पण आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आंबेडकरांना जर काही जाहीर करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जाहीर करायचं असतं. एखाद्या पक्षाबाबत भूमिका घेणं योग्य नाही,” असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, ४० बड्या नेत्यांची नावे

Spread the love