Sharad Pawar । शरद पवार मराठा की ओबीसी?, शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल

Sharad Pawar

Sharad Pawar । सध्या राज्यभर मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून जोरदार आंदोलने सुरू आहेत. दोन्ही समाज आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यावर सर्व पक्षांचे एकमत आहे.

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली

आरक्षणावरून राजकीय नेते वेगवेगळे मत मांडत असले तरी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वेगळ्या प्रकारे ट्रोल केले जात आहे. काहींच्या मते शरद पवार ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या मागे आहेत तर काहींच्या मते मराठा आंदोलनाचे सूत्रधार शरद पवारच आहेत. असे आरोप मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर लावले जात आहे. हे सर्व सुरू असतानाच आता शरद पवार यांच्या शाळेचा दाखला व्हायरल केला जात आहे. त्याच्यावर पवारांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.

Sharad Pawar । महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप, पुतण्याला भेटल्यावर शरद पवार काय म्हणाले?

मागच्या दोन दिवसापासून शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दाखल्यावर शरद पवारांची जात मराठा नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी ओबीसीचे सर्टिफिकेट घेतल्याचा मेसेज देखील सोशल मीडियात व्हायरल होत होता. त्यामुळे शरद पवार हे ओबीसी असल्याचा दावा केला जात होता. मात्र शरद पवारांचे समर्थक विकास पासलकर यांनी पवार यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखल दाखवत सर्व आरोप फेटाळले आहेत.

Lalit Patil । ड्रग्ज माफिया ललित पाटीलची तब्येत बिघडली; रुग्णालयातच उपचार सुरू

Spread the love