MLA P. N. Patil । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील (MLA P N Patil) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. यांमुळे राजकारणात मोठा शोक व्यक्त केला जात आहे. आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पी. एन. पाटील पाटील यांची प्राणज्योत मालवली.
त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली. बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यामुळे पी. एन. पाटील यांच्यावर मागच्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज (23 मे) सकाळी 10 वाजता आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे.