Devendr Fadanvis । पोर्श गाडी बंगळुरमधून पुण्यात कशी आली? फडणवीसांनी केला सर्वात मोठा खुलासा

Devendr fadanvis

Devendr Fadanvis । सोमवारी (20 मे) पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुण्यातील एका तरुण जोडप्याचा जीव घेणारी पोर्श टायकन कार या वर्षी मार्चपासून कोणत्याही नोंदणीशिवाय सुरू होती. रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या मुलाने चालविलेल्या आलिशान वाहनाने रविवारी रात्री पहाटे दोन 24 वर्षीय तरुणांना धडक दिली. वाहनधारकाने वाहन खरेदी करताना आवश्यक नोंदणी शुल्क भरले नसल्याचे आता समोर आले आहे. या घटनेमुळे अनेकांकडून मोठा संताप व्यक्त होत आहे.

Hsc Result । ब्रेकिंग! बारावीचा निकाल जाहीर, या ठिकाणी पाहा ऑनलाईन पद्धतीने निकाल

यामध्येच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये जात घटनेची माहिती घेत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ही गाडी कुठून आणली गेली? याबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Manohar Nalge Death । खळबळजनक! ठाकरे गटाचा पोलिंग बूथ एजंट आढळला मृतावस्थेत, मुंबईतील मतदान केंद्राच्या शौचालयात सापडली बॉडी

पत्रकार परिषदेत बोलताना दवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही बाब सत्य असून ही गाडी बंगळुरूमध्ये विकत घेण्यात आली आहे. बंगळुरूहुन पुण्याला आणली, गाडी इकडे आल्यावर मालकांकडे काही कालावधी असतो की त्या काळात आरटीओकडे रजिस्ट्रेशन करायचं असतं. मात्र गाडीचे रजिस्ट्रेशन झाले नाही. त्यामुळे आता यासंदर्भात वेगळे काही वॉयलेशन असेल तर वेगळा एफआयआर दाखल केला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Pune Accident । पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

Spread the love