Pune Crime News । गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरलं, पैशाच्या वादातून झाडल्या गोळ्या

Pune Crime News

Pune Crime News । महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना थांबत नाहीत. मुंबईनंतर सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात यावेळी पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात आर्थिक वादातून हा गोळीबार झाला. गोळी झाडणाऱ्या आरोपीनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

Maharashtra politics । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! निवडणुकांपूर्वी शिंदे गटात केला ५३ नगरसेवकांनी प्रवेश

शनिवारी संध्याकाळी पुणे शहरातील एका हॉटेलबाहेर झालेल्या वादातून एका 52 वर्षीय व्यक्तीने ज्वेलरी दुकानाच्या मालकावर गोळीबार करून जखमी केले, त्यापूर्वी त्याने ऑटोरिक्षात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

Accident news । नवले पुलाजवळ वाहनांचा भीषण अपघात, टँकरने दिलेली चार वाहनांना धडक पाहून पोलिसही चक्रावले

दुकान मालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिल ढमाले (वय ५२, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. आकाश गजानन जाधव (वय ३९, रा. बाणेर) असे जखमी दुकान मालकाचे नाव आहे.

Sameer Wankhede । पुन्हा वाढल्या समीर वानखेडेंच्या अडचणी! मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने केला गुन्हा दाखल

Spread the love