Maharashtra politics । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! निवडणुकांपूर्वी शिंदे गटात केला ५३ नगरसेवकांनी प्रवेश

Maharashtra politics

Maharashtra politics । मुंबई : निवडणुका (Election 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्व पक्ष निवडणुकीच्या तोंडावर तयारीला लागले आहेत. पहिल्यांदा राज्यसभा नंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आता निवडणुकांपूर्वी शिंदे गटात (Shinde group) ५३ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. ज्याचा शिंदे गटाला आगामी निवडणुकीत खूप फायदा होईल. (Latest marathi news)

Accident news । नवले पुलाजवळ वाहनांचा भीषण अपघात, टँकरने दिलेली चार वाहनांना धडक पाहून पोलिसही चक्रावले

ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवास्थानी आज दुपारी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर नगर भागातील प्रभाग क्रमांक १२५ मधील नगरसेविका रुपाली हावळे, त्यांचे पती सुरेश हावळे आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (Mumbai corporetors) राज्यात सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे विकासाला साथ देण्यासाठी मुंबईतील ५३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Sameer Wankhede । पुन्हा वाढल्या समीर वानखेडेंच्या अडचणी! मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने केला गुन्हा दाखल

मी घरात बसणार मुख्यमंत्री नाही तर रस्त्यावर उतरुन काम करणारा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे अनेकांना आपल्यावर विश्वास दाखविला आहे, असाही त्यांनी खोचक टोला नाव न घेता उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. विकासावर विश्वास असेल तर येत्या काळात देखील पक्ष प्रवेश सुरुच राहील, असाही शिंदे यांनी दावा केला.

Nikhil Wagle । घडीची सर्वात मोठी बातमी! निखील वागळेंसह 200 जणांवर गुन्हे दाखल, नेमकं कारण काय?

Spread the love