Accident news । नवले पुलाजवळ वाहनांचा भीषण अपघात, टँकरने दिलेली चार वाहनांना धडक पाहून पोलिसही चक्रावले

Accident news

Accident news । पुण्यातील नवले पुलावर (Navale bridge) सतत अपघात होत असतात. काही अपघात (Accident) इतके भयानक असतात की यात अनेकांचा जीव जातो. अनेक उपाययोजना करूनही अपघाताचे हे प्रमाण कमी झाले नाही. अपघातात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या याच पुलावर एक विचित्र अपघात झाला आहे. (Navale Bridge Accident)

Sameer Wankhede । पुन्हा वाढल्या समीर वानखेडेंच्या अडचणी! मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने केला गुन्हा दाखल

या अपघातात चार वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या दरम्यान घडलेल्या घटनेत एका टँकरने तीन ते चार वाहनांना जोरात धडक (Tanker Accident) दिली. टँकरचा ब्रेक फेल झाला असल्याने हा विचित्र अपघात झाल्याची माहिती देण्यात येत आहे. अपघातांनंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. (Latest marathi news)

Nikhil Wagle । घडीची सर्वात मोठी बातमी! निखील वागळेंसह 200 जणांवर गुन्हे दाखल, नेमकं कारण काय?

या भीषण अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर काही काळ झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघात पाहून काही काळ पोलिसही चक्रावून गेले होते. हा अपघात नेमका कसा झाला, हे त्यांनाही समजत नव्हतं.

Chhagan Bhujbal । सर्वात मोठी बातमी! अज्ञात व्यक्तीने दिली छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

Spread the love